आष्टीत दोन महिलांचा विनयभंग…

आष्टीः दि.३(प्रतिनिधी) शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टी येथील अमोल शिवाजी थोरात आणि अंगद पंडित थोरात (दोघे रा. आष्टी ता. परतूर) या दोघांनी एकीस अश्लील भाषेत शिवीगाळ करुन तर दुसऱ्या एकीचा विनयभंग (Molestation) करत जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल (Mobile) पळवल्याची घटना घडली. दोघां विरुध्द आष्टी पोलिसात (Police) पिडित दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, या दोन्ही आरोपीनी आष्टी (Ashti) येथील पाटील गल्ली येथे एका घराच्या संरक्षक भिंतीवरून येत घराची कडी वाजविली व तेथील महिला व तिच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या एका घरी याच दोघांनी महिलेचा विनयभंग (Molestation) केला व जाताना खिडकीतील मोबाईल (Mobile) पळवला. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित दोन्ही महिलांनी आष्टी (Ashti) पोलीस (Police) ठाण्यात दिली. या तक्रारीवरून अमोल शिवाजी थोरात व अंगद पंडित थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. बी. सानप यांनी भेट दिली. तपास पो.ना. सुक्रे, पो.ना. गौड हे करीत आहेत.