धारुर तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला; सहाय्यक फौजदार जे. एस. वावळकर यांचे निधन.

किल्लेधारूर दि.26 मे – धारुर तालुक्याचे सुपूत्र व माजलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जे. एस. वावळकर (वय 50) यांचे बुधवार (दि.25) मे रोजी सकाळी 11. 15 वाजता माजलगाव येथे आजाराने निधन झाले.
सहाय्यक फौजदार जे. एस. वावळकर हे मुळचे धारुर तालुक्यातील कारी येथील रहिवासी होते. त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात आपली सेवा दिली. धारुर पोलिस ठाण्यात त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. अतिशय मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वावळकर यांची ओळख होती.
त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कारी (ता. धारूर, जि.बीड) येथे अतिशय शोकाकुल वातावरणात सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीडचे पोलिस उपनिरीक्षक जाधवर, कांबळे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब बिनकडे, माजलगावचे सहाय्यक फौजदार नरवडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
बुधवारी कारी येथील सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वावळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परीवार आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
( Dutiful officer lost in Dharur taluka; Assistant Sub-Inspector of Police J. S. Wavalkar passed away. )