रवी कुमार दहियाने रौप्यपदकावर नाव कोरलं; भारताचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये डंका.

(Advt.)
टोकियो दि.5 अॉगस्ट – आजच्या दिवशी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावर (Silver medal) आपलं नाव कोरलं आहे. रवीचा थोडक्यात पराभव झाला असून दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदक जिंकलं आहे. पण रवीच्या या पदकासोबतच भारताची यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक संख्या 5 झाली आहे.
(Ravi Kumar Dahiya carved a silver medal; India’s Danka at the Tokyo Olympics.)
भारताचा (India) पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक (Gold medal) नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. परंतू या सामन्यात त्याचा पराभव झाल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन) कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ) पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे. तर रविकुमार दहियानेही कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकसाठी 3 दिवस शिल्लक असताना, भारतालाही संबंधित स्पर्धांमध्ये आणखी मोठ्या पदकांच्या आशा आहेत.