बीड जिल्ह्यात पुन्हा वाढ; केज, अंबाजोगाई, बीडची चिंता वाढली;

बीड दि.24 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज पुन्हा वाढली आहे. काल 207 असलेली संख्या आज 299 झाली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2056 प्राप्त अहवाला पैकी 299 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1757 जण निगेटिव्ह आली आहेत. आज एकोणिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 104 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत.
अंबाजोगाई व केज तालुक्यात आज संख्या अधिक वाढली आहे. केज 30 तर धारुर तालुक्यात आज 4 कोरोना बाधित आढळली आहेत. काल अंबाजोगाईत 56 असलेली संख्या आज 80 वर पोहोचली आहे.
(Re-growth in Beed district; Cage, Ambajogai, Beed’s anxiety increased;)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-104, अंबाजोगाई-80, आष्टी-15, धारुर-4, गेवराई-16, केज-30, माजलगाव-19, परळी-14, पाटोदा-7, शिरुर-4, वडवणी-6
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.24 बुधवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 207 वरुन 299 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे.
दरम्यान, मंगळवारी राज्यात दिवसभरात 27 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या प्रादुर्भावावर आज निर्बंध व लॉकडाऊन बाबत मंत्रीमंडळात चर्चा होत आहे.