या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ; चिंताजनक परिस्थिती.

अहमदनगर दि. 11 एप्रिल – अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची विक्रमी रुग्णवाढ शनिवारीही कायम असल्याचे दिसुन आले. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल 2414 रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

(Record increase in corona patients in the district; Worrying situation.)

देशभरातील टॉप टेनमध्ये सहभागी अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन (lockdown) सारखे अनेक निर्बंध असताना गेल्या 24 तासांत जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 902, खाजगी प्रयाेगशाळेत 412 आणि रॅपिड ॲन्टीजन चाचणीत 1100 जणांना काेराेना विषाणू संसर्गाचे निदान झाले.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –
नगर शहरात 531 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात दोनशेच्या पुढे, तर काेपरगाव, अकाेले, पारनेर, कर्जत, राहुरी, अहमदनगर तालुक्यातील रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे.

अहमदनगर (Ahemadnagar) शहर 531, राहाता 281, संगमनेर 70, श्रीरामपूर 243, नेवासे 65, नगर तालुका 198, पाथर्डी 59, अकाेले 171, काेपरगाव 110, कर्जत 135, पारनेर 137, राहुरी 154, भिंगार शहर 87, शेवगाव 71, जामखेड 49, श्रीगाेंदे 43, इतर जिल्ह्यातील 04आणि मिलिटरी हॉस्पिटल 06 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विषाणूवर मात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले. शिवाय नाईट कर्फ्यूही लागू आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन (lockdown) आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वप्रकारची खरबदारी घेतली जात आहे. पण, तरीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!