माझं गाव

धारुरच्या कार्यक्रमात उलगडले UPSC यशाचे रहस्य; आसिम खान यांनी व्यक्त केल्या भावना.

किल्लेधारूर दि.24 नोव्हेंबर – यशप्राप्तीसाठी भाषेचे बंधन नसून कठोर परिक्रम आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही यश मिळवता येते असे प्रतिपादन येथील सत्कार स्विकारताना नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सर्व परिक्षांत यश मिळवलेले व देश पातळीवर 558 रँक (Ranking) मिळवणारे आसिम किफायत खान यांनी केले.

(Secrets of UPSC success unfolded in Dharur’s program; Emotions expressed by Asim Khan.)

धारुर (Dharur) शहरात आज दि.23 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परिक्षांत यश मिळवलेले आसिम किफायत खान यांचा सत्कार व हल हबीब जकात फाऊंडेशन या संस्थेच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिराज खान आरजू (Siraj Aarju) तर प्रमुख पाहूणे म्हणून शहेबाज मोहमद फारोक मनियार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सय्यद हारुण यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहूणे शहेबाज मनियार यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या व शैक्षणिक चढ उतार यावर प्रखर मत व्यक्त केले. ज्या समाजाचा सर्वोच्च धर्मग्रंथाची सुरुवातच ‘इक्रा’ शिका असा आहे त्या समाजाने अंमल सोडल्यामुळे अधोगतीकडे गेला असल्याचे सांगितले. पुढे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम तत्वज्ञानींचे उदाहरण देत शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचे आवाहन केले.

यावेळी आसिम खान यांनी उपस्थितांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2020) यशाबद्दल आपला प्रवास विषद केला. 2015 पासून लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परिक्षेपासून मुख्य परिक्षा व तोंडी मुलाखतीपर्यंतच्या काळात आलेल्या संकटाला त्यांना कसा सामना केला ते सांगितले. UPSC तयारी करताना आलेल्या कौटुंबिक अडचणीही त्यांनी मांडल्या. देशात नुकत्याच आलेल्या निकालात उर्दू माध्यमाचे ते एकमेव यशस्वी परिक्षार्थी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना लोकसेवा आयोग असो की इतर स्पर्धा परिक्षा यात भाषेची कोणतीही अडचण नसून कठोर परिश्रम व जिद्द असावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सिराज आरजू यांनी आगामी काळात धारुर सारख्या ग्रामीण भागातूनही आसिम खान (Asim Khan) यांचा आदर्श घेवून वरिष्ठ अधिकारी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. खतीब यांनी तर आभार फेरोज मोमीन यांनी केले.

कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्धता व पालक, विद्यार्थ्यांसह महिला व मुलींची उपस्थिती लक्षवेधी ठरली. शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अल हबीब जकात फाउंडेशन या संस्थेचे कौतूक करण्यात आले. यावेळी शहरातील जमियते उलेमा हिंद, एआयएमआयएम (AIMIM), मिल्लिया प्राथमिक व माध्यमिक शाळा, पत्रकार संघ, ग्रीन स्टार क्रिकेट क्लब, विश्व मानवाधिकार आदीकडून आसिम खान यांचा सत्कार करण्यात आला.

बीड (Beed) व परळीहून आलेल्या समाजप्रेमी नागरिकांनीही खान यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद शाकेरअली (Sayyad Shaker), आवेज कुरेशी, सादेकभाई मदिनेवाले, सय्यद अफसर, अतिक मोमीन, शेख सिद्दिक, आखिल मोमीन, सय्यद जमिल, हाफीज शेख साजेद, सय्यद तौफीक यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!