आत्मनिर्भर योजनेच्या अंमलबजावणीसाठी खा.प्रितमताईंनी घेतला आढावा  

रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबांना धान्य मिळणार असल्याने आधारसह रेशन दुकानदारांकडे नोंदणी करा - सलीम जहाँगीर

बीड दि.३१ (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत रेशन कार्ड नसणाऱ्या कुटुंबांना जूनच्या पहिल्या आठवड्यात धान्य मिळणार आहे. यासंदर्भात खा. प्रितमताई मुंडे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून ऑनलाइन आढावा घेत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला धान्य मिळते की नाही याची दक्षता घेण्याचे अवाहन केले आहे. आपल्या भागात अशा नागरीकांची नोंदणी करून घेण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाहीत अशा लोकांनी आपली नावे आधारकार्डसह आपल्या भागातील रेशन दुकानदारांकडे नोंदवावीत असे आवाहन भाजप नेते तथा जिल्हा दिशा सनियंत्रण समितीचे सदस्य सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेक कुटुंब अडचणीत आहेत. अशा कुटुंबांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबांनाही जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून धान्य देण्यात येणार आहे. यासंदर्भात तालुकानिहाय नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी यद्या तयार आहेत. त्यादृष्टीने धान्य वाटपाचे नियोजन करण्याचे काम सुरू झाले आहे. रेशन दुकानदार विना शिधापत्रिका धारकांच्या यद्या तहसील कार्यालयात जाम करत असून त्याअनुषंगाने तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे धान्य मागणी नोंदवत आहेत. ज्या कुटुंबांकडे रेशन कार्ड नाही आणि ज्यांनी आतापर्यंत यासंदर्भात कुठेही नोंदणी केली नाही आशा नागरिकांनी आपल्या भागातील रेशन दुकानदारांकडे आधार कार्डसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जूनच्या पहिल्या आठवड्यात धान्य मिळण्याच्या दृष्टीने हे काम अधिक गतीने करावे असे आवाहन भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!