रेल्वे मंत्रालयात 1074 पदांची भरती; पहा अर्ज करण्याची पध्दत.

नवी दिल्ली दि.13 मे – गतवर्षी पासून कोरोना संकटामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मधल्या काळात अनेक जण नोकरीच्या शोधात होते. पुन्हा एकदा देशात कोरोनाने थैमान घातले असताना नौकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आता रेल्वे मंत्रालयात (Ministry of Railways) नोकरी उपलब्ध होणार असल्याचे दिलासादायक वृत्त आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ भारत सरकार (रेल्वे मंत्रालय) ने भरती (Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे.
(Recruitment of 1074 posts in the Ministry of Railways; See how to apply.)
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (DFCCIL) विभागात ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (Junior Executive) एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनिअर मॅनेजरच्या एकूण 1074 पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया जारी करण्यात आली. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट dfccl.com च्या माध्यमातून 23 मे, 2021 पर्यंत नोकरीसाठी अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता – एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर मॅनेजर (Junior Manager)(सिव्हिल) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण पदवीधारक असणे गरजेचे आहे.
पदांचा तपशील
– ज्युनिअर मॅनेजर – 111 पद
– एक्जिक्युटिव्ह – 442 पद
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 521 पद
– एकूण पद- 1074
वयोमर्यादा काय?
– ज्युनिअर मॅनेजर – 18 – 27
– एक्जिक्युटिव्ह – 18 – 30
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 18 – 30
(Junior Executive)
पगार किती?
– ज्युनिअर मॅनेजर (Junior Manager)- 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना
– एक्जिक्युटिव्ह – 25,000 से 68,000 रुपये प्रति महिना तक
– ज्युनियर एक्जिक्युटिव्ह – 50,000 रुपये प्रति महिना.
अशी होईल निवड ?
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (DFCCIL) लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून ही निवड केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तात्काळ अधिकृत वेबसाईट dfccl.com च्या माध्यमातून 23 मे, 2021 पर्यंत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.