राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिनी आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान करण्याचे आवाहन

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) धारूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ व्या वर्धापन दिना निमीत्त ग्रामीण रुग्नालयात रक्तदान शिबीराचे आयोजन १० जुन बुधवार  रोजी आयोजीत करण्यात आले असून या रक्तदान शिबीरात जास्तीत  जास्त रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  नितिन शिनगारे यांच्या  वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिना निमीत्त आ.प्रकाशदादा सोंळके यांचे मार्गदर्शनाखाली धारूर येथील ग्रामीण रुग्नालयात १०  जुन बुधवार रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोना काळात रक्ताचा फार मोठा तुटवडा भासत असुन रक्ताची आवश्यकता आहे. या शिबिरात आ. प्रकाशदादा सोळंके, सभापती जयसिंगभैय्या सोळंके, राष्ट्रवादीचे  जिल्हा कोषाध्यक्ष माधवराव निर्मळ, जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, तालूकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, प.स. सभापती चंद्रकला हनुमंत नागरगोजे, युवानेते सुधिर शिनगारे, युवकचे तालूकाध्यक्ष सटवा अंडील, लालासाहेब तिडके, बालासाहेब मोरे, आशालता उमाकांत सोळंके, परमेश्वर तिडके आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त रक्तदात्यानी सहभागी होऊन रक्तदान करावे व हे शिबीर यशस्वी करावे असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!