ठोक तरतूदीतुन होत असलेल्या कामावर नगराध्यक्षांची भेट

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) येथील गजानन शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात ठोक तरतुदीतून होत असलेल्या कामावर आज नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी भेट देवून कामाचा आढावा घेतला.
शहरातील गजानन व्यापारी संकूल परिसरात नव्याने विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या ठोक तरतुद मधून १२० गाळे बांधकाम करण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे सदरील काम गेली दोन महिने थांबलेले होते. या कामाची सुरुवात झालेली असुन तळ मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदरील कामाचे अंदाजपत्रकानुसार दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खालच्या बाजूस पार्किंग सुविधा, १२० गाळे व दुसऱ्या मजल्यावर आठ सभागृह व्यापारी दृष्टीने बांधण्यात येत आहेत. या कामाच्या मुरुमाचे परिक्षण होवून प्रत्यक्ष कॉक्रेंट कामास सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी आज दि.३० रोजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी केली असून काही सुचना केल्या. यावेळी संतोष सिरसट, बिभिषण गायकवाड, चोखाराम गायसमुद्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काळे, महादेव देशमुख यांची उपस्थिती होती.