महाराष्ट्रात बुधवारी कोरोना उद्रेक… आढळली सर्वाधिक रुग्ण

मुंबई दि.11 मार्च – बुधवारी महाराष्ट्रात (Maharashtra) तब्बल 13,659 नवीन रुग्ण आढळून आली आहेत. तर 54 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची (Death) नोंद करण्यात आली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22,52,057 एवढी झाली आहे. बुधवारी 9,913 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 20,99,207 करोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण 99,008 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत.
(Corona outbreak in Maharashtra on Wednesday … Most patients found)
महाराष्ट्रात (Maharashtra) मागील आठवड्याभराच्या तुलनेत बुधवारी काेराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टाेबर 2020 नंतर ही सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 13,659 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित (Corona Positive) रुग्णांची एकूण संख्या 22,52,057 झाली आहे. 9,913 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 20,99,207 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण 99,008 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) आहेत.
दरम्यान, राज्यात बुधवारी 54 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची (Death) नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.34% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण 54 मृत्यूपैकी 34 मृत्यु हे मागील 48 तासातील तर 18 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 2 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 2 मृत्यू अकाेला-1 आणि ठाणे-1 असे आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,71,15,534 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,52,057 (13.16 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,71,187 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,244 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, मुंबईतही बुधवारी काेराेना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. दिवसभरात 1539 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या 337134 एवढी झाली आहे. तर बुधवारी 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत 11515 मृत्यूची नोंद करण्यात आली.