सायबर क्राईम… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग; केज मधील धक्कादायक घटना.

केज दि.6 मे – केज (Kaij) तालुक्यातील एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे फोटो स्टेट्स ठेवून तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग ( molestation ) केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदरील तरुणावर केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यात काही दिवसांपुर्वीच मुलीचे फोटो सोशल मेडियात व्हायरल करण्याच्या वादातून मुलीच्या बापाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर आज पुन्हा सोशल मेडीयाचा वापर करुन रोड रोमिओने मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार केज तालुक्यात समोर आला आहे. सदर प्रकारामुळे सोशल मेडीयाचा (Social Media) तरुणाईत होत असलेला गैरवापर व वाढते सायबर क्राईम (Cyber Crime) हा विषय चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील एक तरुणी महाविद्यालयात जात असताना रोड रोमिओ सोमेश्वर संदीपान महाडीक याने मोबाइलद्वारे फोटो काढून ते फोटो व्हाट्सॲपच्या स्टेट्सला ( Whatsapp status ) ठेवले. येवढेच नाही तरा सदरील फोटो तरुणीच्या मामा व चुलत्यांना व्हाट्सअपवर (Whatsapp) पाठविले. तसेच तरुणीचा वाईट हेतुने हात धरून विनयभंग केला असल्याची फिर्याद (दि.5) तरुणीने केज पोलीस ठाण्यात दिली आहे.
या फिर्यादीवरून सोमेश्वर संदीपान महाडिक याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 156/2022 भा.दं.वि. 354, 354(अ), 354(ड), 452, 506 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
( Cyber crime … molestation of a college girl; Shocking incident in the Kaij. )