कोरोंना विशेष

खळबळजनक… कोरोना लसीचा दुसरा डोस घेताच भिवंडीत एकाचा मृत्यू

भिवंडी: दि.3 मार्च- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात लसीकरण मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे. यातच भिवंडीत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

(Sensational … One dies in Bhiwandi after taking second dose of corona vaccine)

सध्या केद्र सरकार कोरोना लसीकरणासाठी (corona vaccine) विशेष प्रयत्न करत आहे. देशातील प्रत्येक वयोगटातील लोकांना ही लस देण्यासाठी मोहिम राबवण्यात येत आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काहींना थोड्या फार लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट दिसुन आली होती. मात्र भिवंडीत लसीकरण केद्रांत दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल घडली आहे.

विशेष म्हणजे दुसरा डोस घेतल्यानंतर या व्यक्तीवर लसीकरण केंद्रातच मृत्यू ओढावलाय. (Bhiwandi One died after taking the second dose of corona vaccine)
सुखदेव महापती किर्दत (41) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सुखदेव महापती किर्दत हे चालक म्हणून कार्यरत होते. भाग्यनगर लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यास गेले असता त्यांच्यासोबत हा प्रसंग घडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!