माकड समोर आल्याने रिक्षाचा अपघात; वृद्ध महिलेचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना…

माजलगाव दि.19 जुलै – माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील शेतात काम करण्यासाठी जात असलेल्या ऑटो रिक्षा (Auto rickshaw) समोर अचानक माकड आल्याने रिक्षा पलटी होवून अपघात (Accident) झाला. या अपघातात गजराबाई हारीभाऊ हजारे (वय 60) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.
(Rickshaw accident due to monkey coming in front; Death of an elderly woman; Incidents in Majalgaon taluka …)
वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यापुर्वीही केज तालुक्यात हरिण व परळी तालुक्यात रानडुक्कर वाहनासमोर आल्याने अपघात होवून माणसांला जीव गमवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातच आज माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे रिक्षासमोर अचानक माकड आल्याने अपघात झाला असून यात एका वृध्देचा जीव गेला तर चौघीं जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून शेतात खुरपणीची कामे सुरु आहेत. माजलगाव (Majalgoan) तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतातील खुरपणीची कामे जोरात सुरू आहेत. शेतात काम करणाऱ्या महिला भेटत नसल्याने अनेक शेतकरी मजुरांना वाहनाद्वारे येण्या जाण्याची सोय करत असतात.
लोणगाव येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास याच गावातील शेतमजूर घेवून जाणाऱ्या ऑटो रिक्षा लोणगाव – जीवनापूर रस्त्यावरून जात असताना समोरून अचानक रिक्षासमोर माकड (Monkey) आल्याने चालकाचा रिक्षा वरील ताबा सुटला व रिक्षा पलटी होऊन बाजूच्या खड्ड्यात पलटला.
या रिक्षात असलेल्या गजराबाई हजारे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच मरण पावल्या व नंदिनी अशोक हजारे (वय 14) या मुलीच्या दोन्ही पायाला मार लागला. जखमी मुलीस माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दोन ते तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. या जखमी महिलांवर लोणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.