वडवणीजवळ रिक्षा- दुचाकीचा भीषण अपघात; एक तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी.

वडवणी दि.18 एप्रिल – वडवणी (Wadwani) तालुक्यातील पुसरा फाट्याजवळ बीड परळी (Beed Parli) महामार्गावर बीडकडून परळीकडे जाणाऱ्या रिक्षा व दुचाकीची (Rickshaw two wheeler) समोरासमोर धडक होवून रात्री भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
आंबेवडगाव ता.धारुर (Dharur) येथील लग्नाचे फोटोग्राफीचे काम उरकून गावाकडे जात असताना वडवणी तालुक्यातील पुसरा फाट्याजवळ बीड-परळी महामार्ग (Highway) रोडवर बीडकडून परळी कडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक MH-22 AN-3295 या ॲटो रिक्षाने दुचाकी क्रमांक MH-23 BB-6026 या दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याची घटना रविवार दि. 17 एप्रिल रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान घडली आहे.
या भीषण अपघातात मयतचे नाव सुनील कारभारी कदम रा. बेलवाडी ता.जि.बीड (वय 19 वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी योगेश यदा जाधव मौजवाडी (वय 22 वर्ष) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तरुणाला उपचारासाठी खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात हालवले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे. सदरील अपघातात मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते.
( Rickshaw two wheeler accident near Wadwani; One young man killed on the spot, one seriously injured. )