गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद म्हणून देवून महिलेचे दागिने लुटले; केज मधील घटना.

केज दि.25 अॉगस्ट – प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून तो प्रसाद म्हणून खायला देऊन गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेतल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी केज पोलिसांत (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(Robbed the woman of her jewelery by paying her as a pedha prasad; Incidents in the Kaij.)
या बाबत मिळालेली माहिती अशी की, केज येथे दि.24 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे बारा ते एक च्या दरम्यान 48 वर्षीय महिला छाया मुकुंद वाकळे हिला केज (Kaij) येथील सुहाना हॉटेल समोर माणिक त्रिंबक सिरसट व त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमाने प्रसाद म्हणून पेढा दिला. त्या पेढ्यात गुंगी येणारे औषध मिसळले होते.
पेढा खाताच छाया वाकळे यांना गुंगी आली, त्याचा गैरफायदा घेत माणिक सिरसट व त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते पसार (Robbed the woman) झाले. गुंगी उतरताच छाया वाकळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
छाया वाकळे यांनी दि.25 ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात (Police station) तक्रार दिली असून माणिक त्रिंबक सिरसट व त्याचा अनोळखी साथीदार याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 409/2021 भा. दं. वि. 328, 379 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.