बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात दरोडा; तब्बल दिड कोटीचा ऐवज लंपास.

नवी दिल्ली दि.9 एप्रिल – बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची कन्या तथा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्या दिल्लीतील घरात जबरी चोरी (Robbery) झाली असून, चोरट्यांनी घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहेत. याप्रकरणी सोनम कपूर यांच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे सासरे, 22 अमृता शेरगिल मार्ग येथे राहतात. येथे त्यांच्या आजी सासू सरला आहुजा (86), मुलगा हरीश आहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला आहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांच्या खोलीतील कपाटामधून दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार केली. 11 फेब्रुवारी रोजी कपाट तपासले असता दागिने व रोख रक्कम गायब होती. सरला आहुजा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दागिने तपासून कपाटात ठेवले होते.

पोलीस (Police) आता मागील एक वर्षाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासत आहेत. तुघलक रोड पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) सोनंम कपूर हिच्या घरात 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारी काम करतात. सोनम कपूरचा पती आनंद आहुजा काका सुनीलसोबत कॅलिफोर्नियामध्ये (California) राहतो.

तुघलक रोड पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याता आला आहे. सदरील चोरी प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल (High profile) असल्याने नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत. पोलीसांनी सर्वांची चौकशी सुरु केली आहे. क्राइम टीम (Crime Team) व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करण्यात गुंतलेली आहे. अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

( Robbery at Bollywood actress Sonam Kapoor’s house; Lampas looted Rs 1.5 crore.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!