रुक्मिणीबाई सानप यांचे निधन

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) येथील बालाघाट Balaghat शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दिलीप सानप यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई तुकाराम सानप (७०) यांचे रात्री १० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले असुन त्यांच्यावर सितेची न्हानी परिसरात सकाळी ८.३० वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
आदर्श शिक्षक तुकाराम सानप यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रुक्मीणबाई यांची गेल्या काही दिवसांपासून वृध्दापकाळाने प्रकृती अस्वस्थ होती. दि.१८ बुधवार रोजी रात्री १०:१० वाजता त्यांचे निधन झाले. जि.प. शाळेतील एनसीसी विभाग प्रमुख तथा बालाघाट Balaghat शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दिलीप सानप Dilip Sanap व सांगली येथे शिक्षक असलेले संदीप सानप यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.१९ गुरुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता सीता ची नहानी धारूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.