धारूर-अंबेजोगाई रस्त्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना साकडे

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) धारुर, आडस अंबेजोगाई रस्ता दुरुस्त करण्यासाठी ऊसतोड कामगार वाहतुक मजूर व मुकादम संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप श्रीरंग भांगे यांच्या कडून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालक पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना निवेदन देण्यात आले.
धारुर आडस अंबाजोगाई राज्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडली असुन वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. सदरील रस्त्या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले. सध्या धारूर ते अंबेजोगाई पस्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. अंबेजोगाई दवाखाना तसेच लातूरला जाण्यासाठी पर्याय म्हणून नागरिकांना केज मार्गे जावे लागत आहे. या मुळे नागरीकांची खूप गैरसोय होत आहे. या सर्व बाबी पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रसंगी धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे, ऊसतोड कामगार संघटना अध्यक्ष प्रदीप भांगे, जीवन राठोड, सुशीला ताई मोराळे, दादासाहेब मुंडे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.