महाराष्ट्र

Samriddhi Highway Accident… भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला ; 25 जणांचा मृत्यू तर 8 गंभीर जखमी.

53 / 100

सिंदखेडराजा दि.1 जुलै – Samriddhi Highway Accident… चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ खाजगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात बसला आग लागून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी आहेत. ( Samriddhi Highway Accident… Maharashtra was shaken by a terrible accident; 25 people died and 8 were seriously injured.)

महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला समृद्धी महामार्ग सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अपघातांमुळे चर्चेत आहे. याच समृद्धी महामार्गावर रात्री भीषण अपघात होवून 25 जणांनी जीव गमावला. बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे 25 प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. दरम्यान, मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयतांच्या कुटूंबीयांना 5 लाखाची मदत जाहिर केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 8 लोक जखमी आहेत. मी आयजी आणि कलेक्टर यांच्याशी बोललो आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे,
मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न अधिकारी करत आहेत. अपघातनंतर घटनास्थळी यंत्रणा पोहचल्या पण गाडीने पेट घेतल्याने मदत करता आली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!