Samriddhi Highway .. समृद्धी महामार्गावरील अपघातात केजचा तरुण ठार.

केज दि.30 अॉगस्ट – Samriddhi Highway .. आयशर टेम्पोचा अपघात होवून समृद्धी महामार्गावर केज येथील 29 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार सदर अपघात accident वाहनावरील ताबा सुटल्याने झाल्याचे कळते. Samriddhi Highway … Kaij youth killed in accident on Samriddhi highway.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावाहून सिमला मिरची घेवून केज Kaij येथील आयशर टेम्पो (क्र एमएच 44 यु 2807) जबलपूरकडे जात होता. सदर आयशरचा रात्री वर्धा शहराजवळ काही अंतरावर समृद्धी महामार्गावर Samriddhi highway चालक सय्यद आफताब हमीद (वय 29) यांस डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटला व टेम्पो रस्त्यावरील सुरक्षा भिंतीला धडकून भीषण अपघात accident झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचा मृतदेह टेम्पोच्या कॕबिनमध्ये अडकल्याने महामार्ग फायर ॲन्ड रेस्क्यू टिमची मदत घेण्यात आली.