पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार…?

यवतमाळः दि.२३- गेल्या पंधरा दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

(Sanjay Rathore, who was found in trouble in Pooja Chavan’s death case, will remain silent today …?)

परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी आज त्यांच्या निवासस्थानी डेरेदाखल झाले आहेत. अनेक दिवसानंतर वनमंत्री संजय राठोड यांचा अधिकृत दौरा जाहिर झाला आहे. अवघ्या काही वेळात राठोड पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. सध्या स्थानिक नेत्यांशी ते निवासस्थानी चर्चा करत आहेत. तिकडे राठोड यांच्यासाठी पोहरादेवीमध्ये होम हवन होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोहरादेवीत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

चौकशीला सामोरे जावे- जितेंद्र महाराज
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) चौकशीतून काही समोर येत नाही तोपर्यंत कुणाला दोषी ठरवणे हे योग्य नाही किंवा कायद्याला धरुन नाही. चौकशी झाल्यानंतर दोषी कोण आहे हे समोर येईल. चौकशी योग्य दिशेने सुरु आहे. सर्व महंतांची बैठक झाली त्यावेळी, सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याच्या सूचना पोहरादेवी पीठाने दिल्या आहेत, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं. संजय राठोड समाजाचे संयमी नेतृत्व आहे. अशा नाजूक प्रकरणात एकदम समोर येऊन काही बोलणे उचित नसते. संजय राठोड यांनाही वरिष्ठांनी थेट समोर येऊन बोलण्यास मनाई केली असावी, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.

असा असेल दौरा…
वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे पोहोरागड येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. तसा त्यांचा अधिकृत दौराही जाहीर झाला आहे. दुपारी दोन वाजता धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज देवस्थानात देवदर्शनासाठी जाणार आहेत. तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे येऊन कोरोनाचा आढावा घेऊन उपाय योजना सुचविणार आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा असून ते माध्यमासोबत काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!