कोरोंना विशेष

लसीकरणासाठी असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; आजपासून सुरुवात.

मुंबई दि.28 एप्रिल – देशभरात एक मे पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. येत्या शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करणं अनिवार्य असणार आहे.

(Do this online registration for vaccination; Starting today.)

सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण (Vaccination) केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करावा लागणार आहे. लसीकरणासाठी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करणं अनिवार्य आहे.

लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन असं करा.
कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकतात.
www.cowin.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करा.

-Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.
-Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.

Vaccine Registration form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.
तुम्ही vaccine साठी registration केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.

-त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. आणि त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका.
-लसीकरणासाठी Session निवडा, सकाळचे किंवा दुपारचे.
-Vaccine center आणि Date निवडा.
-Appointment book करुन ती confirm करा.
-Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

यामुळे vaccination center वर vaccine देणं सोपं होईल आणि गर्दीही होणार नाही.
याच पद्धतीनं तुम्ही आरोग्य सेतू अॅपवरही रजिस्ट्रेशन करु शकता.

देशातील आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतरपासून आतापर्यंत एकूण 14.77 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारी 24 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 14 कोटी 77 लाख 27 हजार 54 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राने ओलांडला दीड कोटी लसीकरणचा टप्पा…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज 8 लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या (Oxygen) वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen) देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!