सोनिमोहा गावच्या सरपंचाचे निधन; बीड जिल्ह्यात 24 तासात 10 कोरोना बळी.

बीड/किल्लेधारूर दि.14 जून – धारुर तालुक्यातील सोनिमोहा गावचे विद्यमान सरपंच विष्णू अडागळे यांचे आज अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू (corona death) झाला आहे.
(Sarpanch of Sonimoha village dies; 10 corona victims in 24 hours in Beed district.)
सोनिमोहा सरपंचाचे निधन
धारुर तालुक्यातील सोनीमोहा येथील सरपंच विष्णू अडागळे (46) यांचे कोरोना ने दुःखद निधन झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते .
सरपंच (Sarpanch) विष्णू माणिक यांना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. जवळपास एक महिना धारूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विष्णू अडागळे हे गेल्या तीन वर्षांपासून सोनीमोहा येथील सरपंच आहेत. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे . त्यांच्या निधनाने सोनीमोहा सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
24 तासात जिल्ह्यात 10 कोरोना बळी.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या गेल्या 8 दिवसात कमी दिसत असली तरी बीड जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू (corona death) झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यात 2346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 15.39 टक्के आहे
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना विषाणू Corona Virus) चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. एका एका दिवशी पंधराशे च्या पुढे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. मात्र हे प्रमाण हळूहळू कमी होऊन दीडशेच्या खाली आले असून आज बीड जिल्ह्यात 154 नवीन रुग्ण आढळले असून 210 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 89 हजार 491 रुग्ण संख्या झाली असून यामध्ये 85 हजार 587 इतक्या रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत
सध्या बीड जिल्ह्यात 1558 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 हजार 447 बेड शिल्लक आहेत. बीड जिल्ह्यात 152 कोविड सेंटरवर 10000 इतक्या रुग्णांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या बीड जिल्ह्यात 95.3 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे.