कोरोंना विशेष

समाधानकारक … राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; पहा विभागनिहाय स्थिती.

मुंबई, 26 मे – कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातले होते. या कोरोना विषाणूची (Corona virus) लाट आता ओसरत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ  होत आहे. यामुळे आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचं दिसत आहे.

(Satisfactory … The state’s move towards coronation; See section wise status.)

राज्यात बुधवारी 23065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतका झाला आहे. बुधवारी राज्यात 24,752 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या 315042 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसांत राज्यात एकूण 415462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) बुधवारी 453 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 323 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 130 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.62 टक्के इतका झाला आहे.

कुठल्या विभागात किती रुग्ण ?
ठाणे मंडळ – 3871
नाशिक मंडळ – 3634
पुणे मंडळ – 6004
कोल्हापूर मंडळ – 4694
औरंगाबाद मंडळ – 1095
लातूर मंडळ – 1269
अकोला मंडळ – 2619
नागपूर मंडळ – 1566
एकूण – 24752

10 दिवसांत कोरोनामुक्तांची संख्या
26 मे – 23,065
25 मे- 36,176
24 मे- 42,320
23 मे – 29,177
22 मे – 40,294
21 मे – 44,493
20 मे – 47,371
19 मे – 51,457
18 मे – 52,898
17 मे – 48,211

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत बुधवारी कोरोना व्हायरसचे 208,886 नवीन रुग्ण आढळले असून या काळात सुमारे 4172 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी हाच आकडा 3,498 होता. त्याचवेळी नवीन रुग्ण 195,815 नोंदली गेली व ती दोन लाखांवरून खाली आली. कोरोनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!