धारुर निगेटिव्ह; जिल्ह्यात २५ नवीन पॉझिटीव्ह

बीडः रात्री साडे अकरा वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज २५ ने वाढला आहे. यात परळी व बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळली आहेत. धारुर तालुक्यातून पाठवण्यात आलेली सर्व २१ अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
रात्री आलेल्या अहवालानुसार बीड शहरात ६ तर परळी तालुक्यात एकुण १२ अशी सर्वाधिक रुग्णाचा समावेश आहे. अंबाजोगाई व धारुर निरंक आहेत. याशिवाय गेवराई शहरात ६ व पाटोदा तालुक्यातील १ असे जिल्ह्यात एकुण २५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात १७ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर ८ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात १८ पुरुष तर ७ महिला संक्रमित आहेत. धारुर तालुक्यातील चोंडी व शहरातील बाधिताच्या संपर्कातील डॉक्टर कर्मचारी व इतर अशी २१ अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
कृपया बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….