भीषण अपघातात धारुर तालुक्यातील युवकाचा बेंगलोर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यू.

किल्लेधारूर दि.9(वार्ताहर ) धारुर तालूक्यातील आसोला येथील तरूण आबासाहेब बाबासाहेब चोले (28) वर्ष हा खाजगी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो वर चालक (Driver) म्हणून काम करत होता. रविवारी रात्री उशीरा बेंगलोर पुणे राष्ट्रीय महामार्गा (National highway) वर झालेल्या ट्रक व टेम्पोच्या भीषण अपघातात (Accident) तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले. आज मंगळवारी आसोला येथे त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(A youth from Dharur taluka died in a tragic accident on the Bangalore-Pune National Highway.)

आसोला येथील आबासाहेब बाबासाहेब चोले (20) वर्ष हे खाजगी मालवाहतूक करणारे टेम्पो वर चालक (Driver) म्हणून काम करत होता. रविवारी संध्याकाळी उशीरा बेंगलोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) टेम्पो क्र एम एच 12 एस एक्स 0957 हा माल भरून पुणे कडे येत असताना ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात युवक चालक आबासाहेब चोले हा गंभीर जखमी झाला. त्यांला संबंधीत घटास्थळा वरून रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

मंगळवारी सांयकाळी उशीरा त्यांचा पार्थीव देह आसोला येथे आणण्यात आला. शोकाकूळ वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या युवकाच्या वडिलांचा दहा वर्षा पुर्वी मोटरसायकल अपघातात निधन झालेले असल्याने या अपघाता बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आसोला गावावर या घटने मुळे शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!