आजपासून शाळा बंदच; मात्र दहावी बारावीच्या पालकांत संभ्रम… पहा काय आहेत नवे नियम.

बीड दि.10 जानेवारी –  राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, बीड (Beed) जिल्ह्यातही आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांत व पालकांत संभ्रमावस्था आहे.

(School closed from today; But confusion among the parents of 10th and 12th … see what are the new rules.)

बीड जिल्ह्यात (Beed District) आजपासून पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली असून 144 कलम लागू करण्यात आले आहे.

तर, रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून संचारबंदी (Night Curfew) लागू केली आहे. तर आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, ब्युटीपार्लर, स्पा सेंटर, मनोरंजन स्थळे, किल्ले, पर्यटन स्थळे, येणाऱ्या 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) राधाबिनोद शर्मा (Radhabinod Sharma) यांनी दिले आहेत.

शाळा बंदचे (School closed) आदेश काढताना मात्र दहावी व बारावीच्या शैक्षणिक क्रियेकरीता संबंधित शिक्षण बोर्डाच्या वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने (Education Department) आवश्यक कार्यवाही करावी असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. याचा स्पष्टीकरण होत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रम (confusion) निर्माण झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात विवाहासाठी 50 लोकांची मर्यादा तर अंत्यविधीसाठी 20 लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखाचे लेखी परवानगी शिवाय प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयात केवळ 50 टक्के उपस्थित मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमासाठी देखील केवळ 50 लोकांची मर्यादा असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची काहीशी कडक नियमावली जारी (New guidelines) होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!