जिल्ह्यात तीन कोरोना बळी; बीड जिल्ह्यात आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.7 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2900 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 38 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2862 जण निगेटिव्ह आली आहेत. बीड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल असली तरी कोरोना मृत्यू दर चिंताजनक आहे. सोमवारी पुन्हा तिन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-1, आष्टी-13, धारुर-1, गेवराई-2, केज-5, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-2, वडवणी-5 अशी आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत आहे. यात समाधानाची बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरलेली दिसत आहे. कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे. काल केवळ 45 नवीन कोरोना बाधित आढळले होते.

दरम्यान, राज्यात सोमवारी 3, 626 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे.

राज्यात सोमवारी 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,413 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!