Elections आचारसंहिता जाहीर…. पहा कधी होणार लोकसभा निवडणूक.

नवी दिल्ली दि.16 मार्च – Elections … 16 जून 2024 पर्यंत कार्यकाल संपत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. 54 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
7 टप्यात निवडणुका Elections होणार
पहिला टप्पा- 19 एप्रिल ला मतदान होईल
दुसरा टप्पा – 4 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
26 एप्रिल 2024 ला मतदान होणार
तिसरा टप्पा -19 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
चौथा टप्पा – 13 मे ला मतदान
पाचवा टप्पा – 20 मे ला मतदान होईल
सहावा टप्पा – 25 मे ला मतदान होणार
सातवा टप्पा – 1 जून ला मतदान होणार.
*⛔महाराष्ट्र मध्ये 5 टप्यात मतदान…4 जून ला निकाल. मतदान कधी आणि कुठे ?👇**🛑पहिला टप्पा – 19 एप्रिल – चंद्रपूर,रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर**🛑दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी**🛑तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले**🛑चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (sb)**🛑पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ*