पहा संभाव्य मंत्री; कोण ‘इन’ कोण ‘आऊट’… प्रीतम मुंडेनां धक्का.

नवी दिल्ली दि.7 – आज होणाऱ्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात अनेकांचा पत्ता कट होत आहे. तर अनेकांची लॉटरी लागत आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार असून मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. (Union Cabinet expansion) तर आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात 14 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
(See potential minister; Who’s in? Who’s out … Pushing Pritam Munde.)
कोण ‘इन’ कोण ‘आऊट’
नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, आरसीपी सिंह, अजय भट्ट, अजय मिश्रा, कपिल पाटिल, भागवत कराड, डॉ. भारती पवार, शोभा करांदलाजे, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, पशुपति पारस, मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल, भूपेंद्र यादव, सुनीता दुग्गल, शांतनु ठाकुर, अनुराग ठाकुर
यांचा होणार पत्ता कट?
हर्षवर्धन, राव साहेब दानवे पाटिल, देबाश्री चौधरी, रतन लाल कटारिया, सदानंद गौडा,
थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक,
संतोष गंगवार, संजय धौत्रे
यांना मिळणार प्रमोशन?
अनुराग ठाकुर, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, किरण रिजिजू, हरदीप सिंह पुरी, मानुष मा.
महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?
नारायण राणे पत्नीसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील, हिना गावीत, भागवत कराड यांच्या नावाची चर्चा आहे.
प्रीतम मुंडेंना धक्का…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet Expansion) विस्ताराला आता अवघ्या काही वेळ अवधी उरला आहे. महाराष्ट्रातून चार जणांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झालं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. पण, अखेरच्या क्षणी त्यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.