जिल्ह्याची कोविड-१९ स्थिती कशी आहे पहा….. आज ५९ कोरोनामुक्त

बीडः दि.६- कोविड-१९ Covid-19 बाबत जिल्ह्यात समाधानकारक प्रगती होत असल्याचे दिसत असुन दिवसेंदिवस कोरोना (corona) बाधितांची संख्या कमी तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाने आज जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९१.७० दाखवला असून दि.२ आक्टोंबर रोजी याची टक्केवारी ७५.९० होती. आज उपचार घेत असलेल्या ५९ जन कोरोना (corona) मुक्त झाली आहेत.
गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी ठरत होती. यातच जनतेला अनलॉक च्या माध्यमातून मिळणारी सुट कोरोना (corona) संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत होती. अशा कठिण प्रसंगात शासनाकडून राबवली गेलेल्या विविध योजना कामी आल्याचे समाधानकारक चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. कोरोनाची द्विशतकी संख्या आता आटोक्यात येत असल्याचे दिसत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. मृत्यू दर (Death rate) मात्र राज्यातील इतर ठिकाण पेक्षा किंचित जास्त असल्याचे दिसत आहे. आजच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात आजपर्यंतची बाधितांची संख्या १३८५१, एकुण मृत्यू death ४३३ आहे. आज ५९ जनांना बरे होवून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट ११.४ टक्के तर डेथ रेट (Death rate) ३.१२ टक्के आहे. डबलिंग रेट १२८.९ तर प्रति रुग्ण कॉन्टॕक्ट ट्रेसिंग रेट २३.९४ आहे. यातून ३३१७२८ संपर्कातील व्यक्तींचा शोध लागून १३५००५ संशयित नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात १२११५४ निगेटिव्ह तर १३८५१ पॉझिटीव्ह आढळली आहेत. जिल्ह्यात सध्या ६९६ रुग्ण विविध कोविड (covid-19) सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती आज दि.६ रोजी सांयकाळी ४.३० वाजता प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आली.