खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्यामुळे खळबळ; शस्त्रांसह दोघे ताब्यात, एमआयएम कार्यकर्त्यांचा संताप.

नवी दिल्ली दि.4 फेब्रुवारी – AIMIM चे खासदार असदोद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना हल्ल्यात वापरलेल्या अटक करण्यात मेरठ पोलिसांना (Police) यश आलं आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत पोलिसांनी या दोघांना अटक केली.
(Sensation over attack on MP Asaduddin Owaisi; Two arrested with weapons, MIM activists angry.)
या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली असून एमआयएम कार्यकर्त्यांत देशभर संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी संध्याकाळी खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली होती. सदर घटना सीसीटीव्ही (CCTV) कॕमेऱ्यात कैद झाली आहे.
खासदार असदोद्दीन ओवेसी हे मेरठवरुन परतत असताना राष्ट्रीय महामार्ग 24 (National Highway) वर हापुडा-गाजियाबाद या ठिकाणी छिजारसी टोल प्लाझाजवळ (Toll Plaza) त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी यावेळी चार राऊंड फायर केले होते. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि दोन आरोपींना अटक केली. घटनेवेळी वापरण्यात आलेले हत्यार (weapons) जप्त करण्यात आलं आहे.
खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्यावर गेल्या काही महिन्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. आज झालेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता.
खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर त्यांची गाडी पंक्चर झाली. त्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या गाडीतून सुखरुप ठिकाणी पोहोचवण्यात आलं होतं. या घटनेची तात्काळ दखल घेऊन मेरठ पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी तातडीने तपासाचा आदेश दिला होता.
दरम्यान, खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबारीच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली आहे. सध्या पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होत असून या हल्ल्यामुळे कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध करुन संताप व्यक्त होत आहे.