बीड जिल्हा कोरोना अपडेट… तिसरी लाट ओसरली…पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.9 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1285 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 15 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1270 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-3, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-2, केज-3, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या कमी होवून तिसरी लाट ओसरली आहे. आज नऊ तालुक्यात केवळ 15 रुग्ण आढळले आहेत. रविवारी 48, सोमवारी 41, मंगळवारी 53 तर आज केवळ 15 बाधित आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2860 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 599 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 7.10 टक्के, रिकव्हरी रेट 96.80 तर डेथ रेट 2.65 आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात 6,107 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 16,035 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. दिलासादायक बातमी म्हणजे की राज्यात कोरोना बाधित असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे.

आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,16,243 एवढी झाली आहे या पैकी 75,73,069 जण बरे झाले आहे. रिकव्हरी रेट 96.89 टक्के एवढा आहे.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात 96 हजार 69 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत कोरोनामुळे 1 लाख 43 हजार 155 रुग्ण मृत्युमुखी झाले असून राज्याचा कोरोनामृत्यूदर 1.83 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 2,412 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहे तर, 6,39,490 जण होम क्वारंटाईन आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!