ब्रेकींग न्यूज… नगर परिषद निवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर; असे आहेत नवीन आदेश.

बीड दि.6 मे – सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर महाराष्ट्रात नगर परिषद निवडणूकीच्या तयारीने आता वेग घेतला आहे. राज्यातील नगर परिषदांच्या प्रभागरचनेचा सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार आता प्रभागरचनेचा उर्वरित कार्यक्रम पुर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले आहेत.
महाराष्ट्रात नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2022 या दरम्यान मुदत संपत असलेल्या 207 नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ( State Election commission ) नगरपालिकांच्या प्रभागरचनेचे ( Ward ) आराखडा निवडणूक आयोगाकडे ( State Election commission ) 2 मार्चला पाठवायचा, त्याची प्रसिद्धी 10 मार्च रोजी करावयाची व त्यावर हरकती मागवून 1 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
यानंतर मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षण विषयावरुन राज्यात सर्वानूमते कायदा करत सर्व अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दोन दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णया विरुध्द आव्हान याचिकेवर सुणावनी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत पंधरा दिवसांत निवडणूकीचा कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज 207 नगर परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग रचनेच्या उर्वरीत कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
असा होता प्रभाग रचनेचा कार्यक्रम…
दि.2 मार्च प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे.
दि.7 मार्च प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य मिळणे.
हरकती व सुचना
दि.10 मार्च – प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागवण्यासाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे.
दि.10 ते 17 मार्च – हरकती व सुचना मागविणे.
दि.22 मार्च – हरकती व सुचनावर सुणावणी.
दि.25 मार्च – हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधित विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणे.
दि.1 एप्रिल – अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे. (आता नवीन आदेशानूसार हरकती व सुचना मागविणे पासून सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होईल.)
वरील कार्यक्रमात आता सुधारणा होणार असून नवीन हरकती व सुचनांनतर पुढे त्यावर सुनावणी घेवून प्रभाग रचना पुर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अले आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर निवडणूकीकरीता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम यथावकाश राज्य निवडणूक आयोग देईल असे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर आता उर्वरित प्रभाग रचनेचा कार्यक्रम लवकरच जिल्हाधिकारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
( Breaking News … Announced the revised schedule of Municipal Council elections; These are the new commands. )