बीड जिल्ह्यात आजही सातशे पार;अंबाजोगाईचे सलग दुसरे द्विशतक, केज 55 तर धारुर 10.

बीड दि.12 एप्रिल- बीड जिल्ह्यात काल गेल्या दोन महिन्यात सर्वाधिक 1062 कोरोना बाधितांची संख्या दिसुन आली. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4858 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 703 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4155 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Seven hundred crosses in Beed district even today; Ambajogai’s second consecutive double century, Kaij 55 and Dharur 10.)
आज छत्तिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 112 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाईत 239 व आष्टी तालुक्यात 90 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 10 केजमध्ये 55 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-112, अंबाजोगाई-239, आष्टी-90, धारुर-10, गेवराई-25, केज-55, माजलगाव-19, परळी-68, पाटोदा-12, शिरुर-62, वडवणी-11
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.12 सोमवारी दुपारी आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. गेल्या आठवडाभरात सोमवारी 575, मंगळवारी 716, बुधवारी 580, गुरुवारी 711, शुक्रवारी 732, शनिवारी 764, रविवारी 1062 कोरोना बाधित आढळून आली आहेत. दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंतेची बाब ठरत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासांत 63,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34,008 बरे झाले झाले आहेत. या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ही 34,07,245 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून राज्यात सध्या 5,65,587 रुग्ण उपचार घेत आहेत.