राजकीय

Sharad Pawar माजलगाव मतदारसंघात मोठा उलटफेर.. हे आहेत तुतारीचे उमेदवार.

64 / 100 SEO Score

मुंबई दि.25 आक्टोंबर – Sharad Pawar माजलगाव मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर शरद पवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजप नेते मोहनराव जगताप यांची माजलगाव मतदारसंघाची उमेदवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहिर केली. मोहन जगताप यांची भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु होती. माजलगाव मतदारसंघासाठी भाजपाचे मोहन जगताप व रमेश आडसकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी देवून अजित पवारांनी तगडे आवाहन उभे केले होते. यामुळे आता तुतारी कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दि.27 शनिवारी अंतिम यादीत भाजप नेते मोहन जगताप यांची उमेदवार म्हणून जाहिर केली. माजी मंत्री आ. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून जगताप यांची ओळख आहे. मोहन जगताप हे माजी आमदार बाजीराव जगताप यांचे चिरंजीव असून त्यांचा मतदारसंघात मोठा चाहता वर्ग आहे. आता माजलगाव मतदारसंघात तुतारीचे अधिकृत उमेदवार म्हणून मोहनराव जगताप यांची घोषणा करण्यात आली असून यामुळे निवडणूकीची रंगत वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!