अन् थेट बँकेत केला दगडाचा सत्कार…! कार्यकर्त्यांची पीक कर्जासाठी गांधीगिरी.

किल्लेधारूर दि.30 जुलै – परळी तालुक्यातील (कान्नापूर) मोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जि.प. बांधकाम सभापती जयसिंग सोळंके (Jaising Solanke) समर्थक कार्यकर्त्यांनी थेट बँकेत भलामोठा दगड मांडुन त्यास हार घालून ‘आम्हांला पीक कर्ज द्या’ म्हणून गांधीगिरी केल्याची घटना बुधवारी घडली.
(A stone’s throw in the bank …! Gandhigiri for workers’ crop loan.)
सध्या पाऊसमान चांगला झालेला असून मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. धारुर व परळी तालुक्यातील काही गावांसाठी मोहा (कान्नापूर) ता.परळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank) दत्तक बँक आहे. या बँकेच्या कार्यकक्षेतील शेतकरी पीक कर्जासाठी (Crop loan) हतबल झाले आहेत. या बँकेचे शाखा व्यवस्थापक (Branch Manager) एजंट सांगेल त्यालाच कर्ज वाटप करत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड चालू होती.
यासंदर्भात गेल्या काही दिवसांनी येथील शाखा व्यवस्थापकाकडे तात्काळ पीक कर्ज (Crop loan) वाटप करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. मात्र मागणी करूनही शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत असल्याने जिल्हा परिषद सभापती जयसिंग सोळंके समर्थकांनी दि.29 बुधवार रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या याशाखेत घोषणाबाजी करत शाखा व्यवस्थापकाच्या टेबलवर भलामोठा दगड ठेवत त्यास हार घालत गांधीगिरी केली.
दगडाचा सत्कार करुन पीककर्ज तात्काळ वाटप करण्याची मागणी बँक प्रशासनाकडे केली. अशी माहिती जयसिंग सोळंके समर्थक व जैतापूरचे उपसरपंच भागवत दराडे हिंगणी चे उपसरपंच योगेश सोळंके यांनी दिली. याप्रसंगी जयसिंग सोळंके समर्थक रंणजित रूपनर, विशाल सोळंके, पप्पू सोळंके, प्रकाश सोनवणे आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.