शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; 31 मार्चला होणार शस्त्रक्रिया.

मुंबई दि.29 मार्च- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितलं.

(Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital; The surgery will take place on March 31.)

शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया (surgery) केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

यामुळे पवार यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला आहे. पवार यांच्या अमित शहा यांच्या सोबत झालेली भेट गेली दोन दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही मलिक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!