शरद पवार यांना डिस्चार्ज; पंधरा दिवसांनतर होणार दुसरी शस्त्रक्रिया .

मुंबई दि.3 एप्रिल- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखीचा त्रास बळावल्याने मंगळवारी त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती उत्तम असून पुढील पंधरा दिवसांनी त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सात दिवस विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे पवार यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. दरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याने पवार यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
(Sharad Pawar discharged; The second surgery will take place in a fortnight.)
शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली होती. याबाबत माहिती देताना राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शस्त्रक्रियेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया (surgery) यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे (Gallstones) शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, काही चाचण्या घेतल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली.
शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया झालेले शरद पवार दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र वाचतानाचे छायाचित्रे खा.सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमात शेअर केले होते. यांनतर अचाट बुध्दीमत्ता व कसल्याही संकटावर मात करणाऱ्या या योध्द्याला अनेकांनी मानाचा मुजरा सोशल माध्यमातून केला होता. चार दिवसानंतर आज त्यांची रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून पंधरा दिवसानंतर दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे.
पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा (Gallstones) त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र अचानक त्रास सुरू झाल्यानं मंगळवारी पवार रुग्णालयात दाखल झाले होते.
या दरम्यान, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून अनेकांनी प्रार्थना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची विचारपुस करत प्रार्थना केली. पवार यांच्या चाहत्या वर्गातून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करत देवाला साकडे घातले. त्यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.