प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार पुन्हा ब्रीच कँडीमध्ये दाखल; उद्या होणार शस्त्रक्रिया.

, 30 मार्च : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे.

(Sharad Pawar re-admitted to Breach Candy due to ill health; The surgery will take place tomorrow.)

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शरद पवार (Sharad pawar) यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे पण पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.’

शरद पवार यांना म्हणजे पित्ताशयात खडे (Gallstone) झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिली. आज अचानक त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!