शिरुरच्या घटनेमुळे धारुरमधील बिबट्याच्या आठवणींना उजाळा….

किल्ले धारूर दि.10 मे – बीड जिल्ह्यात मागिल काही दिवसात बिबट्या मृत अवस्थेत आढळून येण्याच्या घटना समोर आल्या आहेत. शनिवारी (दि.7) शिरुर तालुक्यात रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या वाघुरात बिबट्याचा अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मात्र धारुर तालुक्यात घडलेल्या बिबट्याच्या मृत्यूच्या घटनेला उजाळा मिळत आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना काळात आष्टी पाटोदा तालुक्यात बिबट्यांचा धुमाकुळ दिसून आला. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना जीवही या काळात गमवावा लागला. यात गेल्या काही दिवसांत पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असून गेल्या काही दिवसांत बिबट्या मृत अवस्थेत आढळून येण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. मागिल पंधरा दिवसांतच दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

एप्रिल महिन्यात (दि.16) रोजी गेवराई येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गढी येथे रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. ही घटना (दि.16) रोजी रात्री 7 च्या सुमारास घडली होती. ही घटना लोक विसरत नाहीत तोच पुन्हा शिकाऱ्याने लावलेल्या वाघोरीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सदरील घटना शिरुर तालुक्यातील भानकवाडी येथील आहे. यापुर्वीही आष्टी तालुक्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळून येण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढला असून प्रशासन मात्र याबाबत ठोस पावले उचलताना दिसून येत नाही.

काय आहे शिरुरची घटना…
शिरुर कासार तालुक्यात भानकवाडी येथील दोरखडा शिवारात शिकाऱ्याने वाघुर लावले होते. यामध्ये रानडुक्कर किंवा सायाळ अडकने अपेक्षित असताना तसे न होता बिबट्या अडकला. ही घटना शनिवार (दि.7) दुपारी 4 वाजता घडली. वाघोरित बिबट्या अडकल्याची वार्ता गावामध्ये पसरताच बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर सदरील घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती बोरघरे, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे, डॉ. आघाव या चौघांनी घटनास्थळी बिबट्याचे ऑन कॅमेरा शवविच्छेलन केले. यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धारुरच्या घटनेला उजाळा….
जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. अलिकडेच धारुर तालुक्यात अनेक ठिकाणी वन्यप्राण्याकडून शेळ्या ठार करण्याच्या घटना घडल्या आहेत. यातच शिरुर तालुक्यात लावलेल्या वाघूरात बिबट्या अडकल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे सुमारे दहा ते अकरा वर्षापूर्वी धारुर तालुक्यातील गांवदरा येथे रानडुकरापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वीजेच्या तारांचे जाळे शेतीला लावल्यामुळे बिबट्याचा तारेला स्पर्श होवून मृत्यू झाला होता. ही घटना 2020-11 मध्ये गांवदरा येथे घडली होती.

( Shirur incident brings back memories of leopards in Dharur …. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!