धारुरचे शिवसेना तालुका प्रमुख शिंदे गटात ; उद्या शिवसेनेची तातडीची बैठक.

41 / 100

किल्लेधारूर दि.28 जुलै – धारुरचे शिवसेना तालुका प्रमुखासहीत अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
( Shiv Sena taluka chief of Dharur in Shinde group; Urgent meeting of Shiv Sena tomorrow. )

धारुर (Dharur) येथील शिवसेनेचे (Shiv Sena) तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्यासह अनंत चिंचाळकर, माजी शहर प्रमुख संजय पंडित, उपशहरप्रमुख नितीनसिंह सद्दीवाल, युवा सेना माजलगाव विधानसभा प्रमुख गणेश पवार, युवा सेना शहर प्रमुख अजित शिनगारे, तालुका सहसचिव बालाजी शिंदे, जागिरमोहा ग्रामपंचायत सदस्य बंडु कोंबडे, रेपेवाडी शाखा प्रमुख आशोक शेंडगेसह तालुक्यातील इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे बुधवारी प्रवेश केला.

धारुर येथे तातडीची बैठक
बीड जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे निदर्शनास येताच धारुर येथे शिवसेनेची तातडीची बैठक दि.29 शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृहावर सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेना धारूर तालुका शिवसेनेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!