शिवसेनेचा महाराष्ट्रात राडा… धारुरमध्ये राणेंचा पुतळा जाळला; भाजप-सेना आमने सामने… भाजप राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.24 अॉगस्ट – केंद्रीय मंत्री (Union Minister)  नारायण राणे विरूद्ध शिवसेनेने (Shiv sena) आक्रमक रूप धारण केलं आहे. नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याजवळ भाजप-शिवसेना आमनेसामने भिडले आहेत. नाशिक येथे शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली आहे. तर बीड जिल्ह्यातील धारुर (Dharur) येथे नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला. या सर्व प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेत राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही परंतू राणे यांच्या पाठिशी भाजप (BJP) असल्याची प्रतिक्रिया दिली.

(Shiv Sena’s Rada in Maharashtra … Rane’s statue burnt in Dharur; BJP-Sena face to face … BJP backs Rane- Devendra Fadnavis)

राणे यांच्या वादग्रस्त विधानावरुन जुहूत अतिशय तणावाचं वातावरण निर्मण झाले आहे. शिवसेनेचे युवासेना प्रमुख वरूण सरदेसाई आक्रमक झाले आहेत. आक्रमक शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांना (Police) देखील धक्काबुकी केली आहे. महिला शिवसैनिकांना पुढे करून शिवसैनिक राणेंच्या बंगल्यावर चाल करून येतील,अशी शक्यता असल्यानं राणे समर्थकांनी महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केलीय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav  Thackery) यांच्या बाबतीतील आक्षेपार्ह विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. यामुळे मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राणे यांच्या पुणे येथील मॉलवर दगडफेक करण्यात आली आहे. सांगलीतही राणेंच्या पोस्टरवर शाईफेक झाली.

शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई आक्रमक… भाजपा कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक केली आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले आहेत. मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राणे समर्थकांनी महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणी केलीय.

संपुर्ण राज्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर येथे शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला असून युवासेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम सोळंके व शहराध्यक्ष अजित शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देवून राणेंचा निषेध करत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, विनायक ढगे, राजकुमार शेटे, बंडू सावंत, बाबासाहेब सराफ, नितिनसिंह सद्दीवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!