बीड दि. 18 मे – Shivsena Maharashtra महाप्रबोधन यात्रेपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाल्याचे चित्र बीड जिल्ह्यात दिसून येत आहे. बीडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना, “मी दोन चापटा लावल्याचा दावा करणाऱ्या” बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. Shivsena Maharashtra Excitement in Thackeray’s Shiv Sena even before Mahaprabodhan Yatra
उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhan Yatra) होत आहे. त्याआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काल दि.18 गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या (Shivsena Maharashtra) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह संपर्कप्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी हे, बीड (Beed) शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाला. त्यानंतर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः व्हिडिओ व्हायरल करत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत अंधारे यांच्या दोन कानाखाली वाजवल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली.
याबाबत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माध्यमांना असा प्रकार घडला नसल्याचे सांगत जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख वरेकर यांच्यात वाद झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. मात्र उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने याप्रकारावर थेट कारवाई केली असून आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासोबतच संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनाही पदावरुन हटवण्यात आले आहे. राज्यात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेतून पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असताना बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत गटबाजीचे प्रदर्शन होत आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महाप्रबोधन यात्रेत काय घडणार याकडे लक्ष लागून आहे.