माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका; ईडीकडून चार कोटीची मालमत्ता जप्त.

नागपूर दि.16 जुलै – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ईडीने (Directorate of Enforcement) जप्त केली आहे. देशमुख हे एकूण 14 कोटीच्या संपत्तीचे मालक आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. यानंतर परमबीर सिंग यांनी कोर्टात घेतल्यानंतर देशमुख यांना कोर्टाच्या आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता.

(Shock to former Home Minister Anil Deshmukh; Assets worth Rs 4 crore seized from ED.)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची ईडीकडून तपासणीही सुरू झाली. आज ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूकीत दाखवली 14 कोटीची संपत्ती
अनिल देशमुख यांनी 2019 मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 14 कोटी 6 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात 12.9 कोटी रुपये अचल आणि 1.7 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्यावर 4.6 कोटींचं कर्जही आहे. त्यांनी 2018-19 मध्ये 16 लाखांचा कर भरला होता. 2017-18 मध्ये त्यांनी 32 लाखांचा कर भरला होता. तर त्यांची पत्नी आरती देशमुख यांनी 2018-19 मध्ये 14 लाख आणि 2017-18मध्ये 11 लाख रुपयांचा कर भरला होता.

परमबीर सिंग यांनी केले होते गंभीर आरोप.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.

देशमुख यांनी वाझेंना, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल असे सांगितले. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.

टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!