दूरदर्शनचा भारदस्त आवाज हरवला; वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन.

मुंबई दि.7 जुन – दूरदर्शनचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (Pradip Bhide) यांचे आज निधन झाल्याचे वृत्त येत आहे. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील (Doordarshan) बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर संध्याकाळी 6 वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे कळते.

दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम (Audiovisual media) असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. 1972 मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

भिडे यांचा वृतनिवेदनापर्यंतचा प्रवास…
प्रदीप भिडे सुरुवातीला एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यानंतर ते रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. त्यानंतर प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनमधून वृत्तनिवेदनास सुरुवात केली. प्रदीप भिडे यांनी शेकडो कार्यक्रम, सभा यांचे सूत्रसंचालन केले. भिडे यांनी त्याकाळी हजारो जाहिरातींनाही आवाज दिला आहे.

प्रदीप भिडे यांचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडेमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. खाजगी कंपनीत नोकरी करत असतानाच नाट्यक्षेत्रात वळाले. अखेर त्यांनी दूरदर्शन मध्ये वृतनिवेदक (News correspondent) म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र भिडे यांच्या निधनाच्या वृत्ताचे अद्याप कुटूंबियांकडून स्पष्टीकरण मिळालेले नाही.

( Lost the elevated voice of television; News correspondent Pradip Bhide passes away. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!