कोरोंना विशेष

धक्कादायक….आज राज्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसह मृत्यूचा उच्चांक

मुंबईः दि.२४- आज राज्यात ८ हजार ८०७ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे करोना बाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे. तर राज्यात आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्य सरकारने करोनाची ही वाढ रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात लॉकडाऊन, संचारबंदी सारखे निर्बंध लागू केले आहेत. मात्र रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

(Shocking …. Death toll with corona positive patients in the state today)

आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या करोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे करोना बाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे. राज्यात आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज बुधवारी पुणे शहरात दिवसभरात सर्वाधिक ७४३ करोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. तीन करोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ३८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोना बाधित आढळले होते, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!