आरोग्य

धक्कादायक… बर्ड फ्ल्यूचा पहिला मानवी बळी; आरोग्य विभागात चिंता.

नवी दिल्ली दि.21 जुलै – सध्या देशात कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला (Third wave of corona) सामोरं जावं लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोरोनाचं संकट संपत नाही तेच बर्ड फ्ल्यूनं (Bird flu) देशातला पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून नवं आव्हान उभं राहिलं आहे.

(Shocking … first human victim of bird flu; Concerns in the health department.)

बर्ड फ्ल्यू (Bird flu) हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग (Infectious diseases) आहे. मात्र या रोगाची आता माणासालाही लागण होत असल्याचं समोर येत आहे. एवढंच नाही, तर बर्ड फ्ल्यूनं यावर्षी देशातील पहिला बळी घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये H5N1 विषाणूची (Virus) लागण झाल्यानं 11 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या या रुग्णालयातील सर्व नर्सेस, डाॅक्टर यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या (Corona Virus) लक्षणांसारखी असल्यानं सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, हा रोग संसर्गजन्य (Infectious diseases) असल्यामुळे पक्ष्यांमधून माणसांमध्ये पोहचण्याची जास्त भीती असते. आधीच जगभरात कोरोनाचं सावट असताना आता या जुन्या रोगानं डोकं वर काढल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोना विषाणूचे (Corona Virus) नवीन व्हेरिएंट (New variant) समोर येत आहेत. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला तिसऱ्या लाटेचा (Third wave of corona) धोका असताना बर्ड फ्ल्यूचे नवे संकट समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!