धक्कादायक…. ‘सीरम’ आगीत पाच जणांचा मृत्यू

पुणेः दि.२१- सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील प्लान्टमध्ये आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू (Death) झाला अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग (Fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी दुपारी सिरमच्या निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्याला आग (Fire) लागली. दहा अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना इमारतीतून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग विझवल्यानंतर इमारतीमध्ये पाच जणांचा मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याचे समोर येत आहे.